तगादा : महापालिका हद्दीतील खेड्यांचे झाले शहर; समस्यांचा मात्र कहर

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : मुकुंदवाडी परिसरातील बाळापूर रेल्वे गेट क्रमांक ५६ लगत राजनगर, मुकुंदनगर, साईनगर, अहिल्याबाई होळकर नगर, स्वराजनगर व अन्य शेकडो परीसरातील नागरी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी बहूजन समाज पार्टी तर्फे जिल्हा सचिव राहूल निकम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Aurangabad
तगादा : न्हावाशेवा कंटेनर टर्मिनलच्या 'त्या' निर्णयामुळे नाराजी

मुकुंदवाडी परिसरातील हा भाग महापालिकेच्या हद्दीत येत असून देखील महापालिकेने अविकसित झोन म्हणून घोषित करत येथील नागरिकांना सेवा-सूविधांपासून वंचित ठेवले आहे.महापालिकेने या भागाचे विकसित झोन मध्ये समावेश करावा व मुलभूत सेवा - सुविधा पूरवाव्यात यासाठी मंगळवारी शेकडो नागरिकांनी भर पावसात थेट वसाहतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी डाॅ. आशुतोष वैद्य यांनी नागरिकांचे निवेदन स्विकारले. नागरिकांचा रोष पाहून त्यानी महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी व अतिरिक्त प्रशासक बी. बी. नेमाने यांना देखील संपर्क केला. मात्र नेहमीप्रमाणे बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनाच टोलवाटोलवी केल्याचा प्रत्यय आला.

Aurangabad
तगादा : दूषित पाणी आपल्या दारी! औरंगाबाद महापालिकेला झाले तरी काय?

अशा आहेत या भागातील नागरिकांच्या अडचणी

● गेल्या चाळीस वर्षापासून या भागात पाणीपुरवठा योजना देखील नाही. मलःनिसारण वाहिनी देखील देखील नसल्याने नागरिकांना कुपनलिकेच्या दूषित पाण्याचा सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापर करावा लागतो.

● दारात ड्रेनेजलाईनची पूरेसी सोय नसल्याने दारातच शोषखड्डे करून मैला आणि सांडपाणी जीरवावे लागते. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

● या भागातील नैसर्गिक नाले देखील अनेक भूमाफियांनी बळकावल्याने पावसाळ्यात पाण्यामुळे वसाहतींना पूराचा धोका निर्माण होऊन त्यामुळे पावसाळ्यात दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरते.

● या भागात माजी नगरसेवीका अनिता साळवे यांनी महापालिकेत प्रयत्न करून सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी खिल्लारी कंन्सट्रक्शन कंपनीकडून भूमिगत गटार योजनेतून काही ठिकाणी चेंबर बांधले पण अत्यंत निकृष्ट झालेल्या या कामातील पाईपातून पाणी न जाता चेंबर ओव्हरफ्लो होऊन अनेक वसाहतीत पाणी तुंबते.

● यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी करूनही कार्यकारी अभियंता राजीव संधा, उप अभियंता मधुकर चौधरी काळजी घेत नसल्याचा या भागातील नागरिकांनी आरोप केला आहे.

●गाजरगवत आणि रानटी झाडाझूडपात अडकलेल्या या वसाहतींमध्ये डासांवर नियंत्रणासाठी नियमित औषध फवारणी देखील तसदी घेतली जात नाही.

● पथदीप नसल्याने भुरट्या चोर्या अवैध धंद्यांना या भागात उत आलेला आहे. यामुळे या भागातील महिला व मुलींच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे पोलिस चौकीची मागणी येथील नागरिकांनी केलीआहे.

● येथील झेंडा चौक ते बाळापूर रेल्वे गेट पर्यंत सर्वे क्रमांक ५९ हद्दीत सिडकोची अनेक एकर जमीन आहे. त्यावर वाणिज्य आणि निवासी विक्रीयोग्य भुख॔डांना चढ्या भावात विक्री व्हावी म्हणून महापालिकेने तातडीने दोन किलोमीटरचा रस्ता केला. मात्र पुढे शेकडो वसाहती असलेला महानगरपालिकेच्या विकास आराडड्यातील बाळापूर रेल्वे गेट क्रमांक ५६ ते बीडबायपास पर्यंत शंभर फुट रस्त्यांचे भीजत घोंगडे कायम आहे.

● सुरूवातीला शासन अनुदानातून मिळालेल्या दिडशे कोटी निधीतून चार किलोमीटर रस्त्यासाठी तीन कोटीचा निधी मंजूर केला होता. मात्र हा निधी इतरत्र वळवला. नंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे गाजर दाखवले मात्र त्यातूनही हा रस्ता वळवल्याने निदान या रस्त्यावरील खड्डे बुजावावेत. अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Aurangabad
आदिवासी विभागाचे 'ते' 113 कोटींचे टेंडर कुणासाठी केले फ्रेम?

महापालिकेचे १८ लाख मातीत

२०१६ - १७ मध्ये महानगरपालिका निधीतून १८ लाख रूपये खर्च करून रेल्वेगेट ते मुकुंदनगर पर्यंत एक किलोमीटर डांबरी रस्त्याचे काम करण्यात आले होते.याकामाचे कंत्राट औरंगाबादच्या ए..एस. कंन्सट्रक्शन कंपनीकडे देण्यात आली होती. तर देखभाल दुरूस्तीची जबाबदारी तत्कालीन उप अभियंता राजीव संधा , शाखा अभियंता मधुकर चौधरी यांच्याकडे टाकण्यात आली होती. मात्र अत्यंत निकृष्ट काम केल्याने रस्ता वर्षभरातच होत्याचा नव्हता.

पीडब्लुडीचे ३० लाख पाण्यात

त्यानंतर २०१९-२० मध्ये माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पाठपुराव्याने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नगर विकास खात्यामार्फत ३० लाख रूपये खर्च करून बीडबाय ते साईनगर दरम्यान अर्धा किलोमीटर काॅक्रीटीकरण करण्यात आले. पण सहा महिन्यातच पीडब्लुडीचे ३० लाख रूपये मातीत गेले. बाळापूर रेल्वे गेट ते बीडबाय या सलग रस्त्याचे विकास आराखड्यानूसार रूंदीकरण व काॅक्रीटीकरण केल्यास चिकलठाणा जालना रोड ते बायपासकडे जाणारी वाहने वळवता येतील. परिणामी शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार्या जालनारोडची वाहतूक कमी होईल. सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचू आहे, यासाठी व्यवस्था करावी.असे या भागातील नागरिकांनी सांगितले.

बाळापूर रेल्वेगेट येथे भूयारी मार्ग कधी

बाळापूर रेल्वे गेट क्रमांक ५६ येथील रेल्वे भूयारी मार्गाचे काम गत दहा वर्षापासून रखडले आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणूकीच्या दरम्यान येत्या चार महिन्यात भूयारी मार्ग करण्याचे अश्‍वासन नेतेमंडळी देते. प्रत्यक्षात पंधरा वर्ष उलटून काम पुर्ण झाले नाही. त्यामुळे मुकुंदनगर आणि राजनगरसह हजारो नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेच्या ये - जा दरम्यान फाटक बंद केल्यावर या भागातील नागरीकांना शहरात येण्याचा मार्ग बिकट झाल्याने, येथील नागरीकांनी वेळोवेळी जनआंदोलन उभारले. यावर माजी नगरसेविका अनिता साळवे यांनी महापालिकेपासून रेल्वे अधिकार्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कामाची तयारी दर्शवली.त्यानुसार पाहणी देखील केली. प्रत्यक्षात जागेची अडचन असल्याचे म्हणत हातवर केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com