नागपूर (Nagpur) : ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे उड्डाणपुलाचे (Ajani Railway Bridge) आयुष्य संपले आहेत. पुलालाही तडे गेले आहेत. मात्र या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. हा पूल कोणी बांधायचा यावरून नागपूर महापालिका आणि रेल्वे यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही संस्था एकमेकांकडे बोट दाखवत आहे.
ब्रिटीश काळात अजनी रेल्वे स्थानकाशेजारी उड्डाण पूल बांधण्यात आला होता. पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. त्यावर प्रचंड वर्दळ असते. याचे आयुष्य संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवले होते. आता या पुलाची जबाबदारी आमची नाही, असे त्यात नमूद केल होते. या पत्रालाही २५ वर्षे उलटून गेली आहेत. आता पुलाच्या सुरक्षा भिंती खचायला लागल्या आहेत. शेजारच्या फूटपाथलाही भगदाड पडले आहेत. या पुलावर अडथळे लावून सध्या जड वाहनांची वाहतूक रोखली आहे. आता पूल पडल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.