तगादा : रेल्वे प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे 'हे' स्टेशन आहे काळोखात

tagada
tagadaTendernama
Published on

चंद्रपूर (Chandrapur) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव सर्वात मोठे असून, लोकसंख्या 17 हजारांच्या आसपास आहे. येथे पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा देण्यात आला आहे. या रेल्वे स्टेशनचे नाव विसापूर गोंडवाना हॉल्ट स्टेशन असे आहे.  मात्र, रेल्वे प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे हे रेल्वे स्टेशन मागील दोन वर्षांपासून अंधारात आहे.

tagada
Exclusive : दादा भुसेजी चाललंय काय?; अतिरिक्त बेंचेस असताना ZP शाळांच्या नावाने खरेदीसाठी 5 कोटी (भाग-3)

परिणामी, पॅसेंजर रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विसापूर गोंडवाना हॉल्ट रेल्वे स्टेशनवर दुपारी 12:45 वाजता येणारी गोंदिया-बल्लारपूर, 2:20 वाजता जाणारी बल्लारपूर-गोंदिया, 3:45 वाजताची गोंदिया-बल्लारपूर सायंकाळी 4:45 वाजताची जाणारी बल्लारपूर-गोंदिया, रात्री 10:30 वाजता येणारी गोंदिया-बल्लारपूर सायंकाळी 6:30 वाजता जाणारी बल्लारपूर वर्धा पॅसेंजर या रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. मात्र, विसापूर गोंडवाना हॉल्ट रेल्वे स्टेशनवर विद्युत व्यवस्था दोन वर्षांपासून बंद आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी पॅसेंजर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विसापूर ग्रामपंचायतीने मध्य रेल्वे प्रशासनाकडे गोंडवाना हॉल्ट रेल्वे स्टेशनवर वीज दिव्यांची व्यवस्था करावी म्हणून पत्रव्यवहार केला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही.

tagada
Exclusive : दादा भुसेजी चाललंय काय? ठेकेदारांची सोय पाहण्यामागे गुपित काय? (भाग-2)

यामुळे गावकऱ्यांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. कित्येक वर्षांपासून या स्टेशनवर पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे येथील रेल्वे स्टेशन दोन वर्षांपासून अंधारात असल्यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने महाव्यवस्थापक मध्य रेल्वे नागपूर व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही, हे दुर्भाग्य आहे. अशी माहिती विसापूर चे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी दिली.

अंडरपास मार्गाचीही दुर्दशा : 

बल्लारपूर तालुक्यात विसापूर गाव सर्वात मोठे असून, पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील बरी आहे. रेल्वे रुळामुळे गाव विभागले आहे. दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने वाहन चालकांना सुविधा म्हणून भूमिगत मार्ग सुरु केला. मात्र, आजघडीला रेल्वे अंडरपास मार्गाची पूर्णता वाट लागली आहे. सिमेंट काँक्रिट रस्ता उखडला आहे. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याच प्रमाणे विसापूर गोंडवाना हॉल्ट रेल्वे स्टेशनदेखील अंधारात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com